Chhatrapati Sambhajiraje Chhatrapati Sakal
आझाद मैदानावरील उपोषणानंतर काल प्रथमच युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरात आले. कोल्हापूरकरांनी अत्यंत उत्साहात त्याचं स्वागत केलं. हेतू प्रामाणिक आणि विचार स्वच्छ असेल, तर कोल्हापूरकर पाठबळ देतात, असे संभाजीराजे छत्रपती म्हटले. (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati came to Kolhapur first time after the fast at Azad Maidan.)
आझाद मैदानावरील उपोषणानंतर काल प्रथमच युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरात आले. समस्त जनतेने त्यांच्या स्वागताची भव्य तयारी केलेली होती. कोल्हापूरकरांनी युवराज संभाजीराजे छत्रपतीजेंचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं. हेतू प्रामाणिक आणि विचार स्वच्छ असेल, तर कोल्हापूरकर पाठबळ देतात; याचा प्रत्यय काल पुन:श्च एकदा आला, असं युवराज संभाजीराजे छत्रपतींचे म्हणाले.
युवराज संभाजीराजे छत्रपतींनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केलं.कोल्हापूर शहरात येताच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब, क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी लक्ष्मीबाई तथा आईसाहेब महाराज व शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या शहरातील स्मारकांना अभिवादन केलं.
महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांस विनम्र अभिवादन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं."ज्या समाजबांधवांच्या न्यायासाठी मी उपोषण केले त्यामध्ये सर्व समाजबांधव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. खरेतर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वतःहून त्यांनीच इतकी मेहनत घेऊन माझ्या जल्लोषी स्वागताचे आयोजन केले, हे पाहून मन खरेच भारावून गेले." अशा भावना युवराज संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केल्या.
निशाणाचा हत्ती, घोडे, रणभेदी गर्जना करणारे धनगरी ढोल व ढोलताशा पथक तसेच टाळ मृदंगाचा गजर करणारे वारकरी यांनी स्वागताच्या मिरवणुकीत विशेष रंग भरले. यावेळी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.अनेक माताभगिनीही यावेळीही उपस्थित होत्या. "कोल्हापूरकरांचे हे प्रेम व जिव्हाळा असाच कायम राहू दे, हिच आई अंबाबाई व जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!" अशी प्रार्थनाही त्यांनी केली. यावेळी उस्फूर्तपणे निघालेल्या मोटारसायकल रॅलीत सहभागी होण्याचा मोह मलाही आवरता आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.