1 crore fund approved for study center in Jalgaon news
1 crore fund approved for study center in Jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : शहरात अभ्यासिकेसाठी 1 कोटींचा निधी; सत्यजित तांबेचे प्रयत्न फळाला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील तरुणांसाठी माहिती केंद्र व अभ्यासिका उभारण्यासाठी महापालिकेला १ कोटींचा निधी (Fund) मंजूर करण्यात आला आहे.

विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी केलेले विशेष प्रयत्न फळाला आले असून, शहरातील तरुणांना या अभ्यासिकेचा लाभ होणार आहे. (1 crore fund approved for study center in Jalgaon news)

महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद, म्हणून अशाप्रकारचा निधी दिला जातो. त्या अंतर्गत जळगाव महापालिका क्षेत्रात अभ्यासिका उभारण्यासाठी निधी मिळावा, म्हणून आमदार सत्यजित तांबे प्रयत्नशील होते.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाच्या नगरविकास विभागाने अभ्यासिका उभारण्यासहत्यात फर्निचर करणे, डिजिटलायझेशन करणे आदी कामांसाठी १ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

या प्रकल्पांतर्गत कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महापालिका असेल. प्रकल्पावरील खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा असल्याने या प्रकल्पांतर्गत निश्‍चित करण्यात आलेल्या कामांना प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक मान्यता असल्याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, तसे या कामास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान करावी.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या प्रकल्पांतर्गत कामे सार्वजनिक ठिकाणीच करावीत, कामाचे स्वरूपही सार्वजनिक असावे. या अंतर्गत सर्व कामे शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी ससंगत असल्याची खातरजमा करावी, यासह अन्य बाबींचा अटी-शर्तीत समावेश आहे.

"जळगाव शहरातील तरुणांसाठी अद्ययावत व सर्व सुविधांयुक्त अभ्यासिका असावी, म्हणून आपण प्रयत्नशील होता. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले आहे."-सत्यजित तांबे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT