Arrest esakal
जळगाव

रेल्वेतून सोने लुटणाऱ्या महिलेसह चौघा भामट्यांना अटक

दागिने लांबविणारी टोळी जळगावची असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कुरिअर कंपनीत डिलिव्हरी मॅन म्हणून सोन्याचे दागिने पोहोचविण्याचे काम करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाचे हावडा एक्स्प्रेसमधून ७ ऑगस्टाला २२ लाखांचे दागिने चोरीला गेले होते. दागिने लांबविणारी टोळी जळगावची असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून एका महिलेसह या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील संशयितांकडून १४ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील प्रख्यात सराफा व्यवसायिकांचे मुंबईत पार्सल घेऊन जाण्याचे काम हरिश्चंद्र खंडू वरखेडे (वय ६४) कुरिअर कंपनीचे कर्मचारी करीत होते. रविवारी (ता. ७) ते तीन सराफा व्यवसायिकांचे एकूण २२ लाख ४३ हजारांचे सोन्याचे दागिने असलेले पार्सल घेऊन हावडा एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने निघाले होते. पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ सतवीर बलवंतसिंग टाक व त्याचा साथीदार रहीम (दोन्ही रा. जळगाव) यांनी खिडकी बंद करण्याच्या बहाण्याने वरखेडे यांच्याजवळील सोन्याचे पार्सल असलेली पिशवी हिसकावून पळ काढला होता. वरखेडे यांनी सहप्रवासी व रेल्वे पोलिसांच्या मदतीने एका चोराला गाडीतच पकडले. मात्र त्यापूर्वीच इतर तिघांनी सोन्याची बॅग घेऊन पोबारा केला हेाता.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टाक याची चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदार शिरसोली नाका परिसरात असल्याची माहिती त्याने दिली. याबाबत रेल्वे पोलिसांनी तत्काळ एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, छगन तायडे, अश्विनी इंगळे यांनी भावना जवाहरलाल लोढा, तनिष्का भावना लोढा व अनिल रमेश चौधरी (तिघे रा. आयोध्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १९ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. या चौघांना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवाना केले आहे.

माय-लेकीचा टोळीत समावेश

भावना जवाहरलाल लोढा आणि तनिष्का भावना लोढा या मायलेकीचा या टोळीत समावेश असून, रेल्वे प्रवासात झालेल्या लूट प्रकरणात प्रमुख भूमिका या दोघींची असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT