Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon News : पारोळा मतदारसंघात 100 कोटींच्या कामांना मंजुरी; विकासकामांना येणार वेग

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : राज्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पारोळा मतदारसंघाचा झुकते माप देण्यात आले असून, आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने मतदारसंघासाठी शंभर कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. (100 crore works approved in Parola Constituency jalgaon news)

यात मुख्यत्वे रस्ते, पूल यासह मूलभूत सुविधांवर भर दिला जाणार आहे. आमदारांच्या प्रयत्नांमुळे यापूर्वी तब्बल १२०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यातील बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे सुरू आहेत.आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीने मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ही संकल्पना अमलात आली.

यात शेतकरी, नागरिकांना दैनंदिन उदभवणाऱ्या समस्यांबरोबर पाणी, रस्ते, लोकाभिमुख विकासकामे, अन्य मूलभूत सुविधांची कामे यांसारख्या अनेक समस्यांनी नागरिक त्रासले होते. या समस्यांतून नागरिकांना मुक्त करावे, यासाठी आमदार पाटील हे अहोरात्र झटत असून, पाठपुरावा करीत राहतात. त्या अनुषंगाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात मतदारसंघासाठी आणखी १००.५१ कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

यात मुख्य रस्ते, गावांना जोडणारे पूल, गावांत काँक्रिटीकरण, प्रशासकीय इमारती या गोष्टींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र. ऊ. ते पिंप्री प्र.ऊ. या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी १२ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात व दैनंदिन नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर पूर्णविराम लागणार आहे.

पावसाळ्यात या दोनही गावांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, दळणवळण या प्रमुख समस्यांना नागरिकांना गेल्या कित्तेक दशकापासून तोंड द्यावे लागत होते. तर आता या पुलाच्या कामाला देखील मंजुरी मिळाली आहे. या सर्वच कामांसाठी आमदार चिमणराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

SCROLL FOR NEXT