esakal
esakal
जळगाव

HSC Result 2023 : बारावीच्या निकालात कही खुशी, कही गम! गुणवंत विद्यार्थ्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बारावी परीक्षेच्या गुरुवारी (ता. २५) जाहीर झालेल्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. निकालात मुलींची बाजी, दरवर्षांपेक्षा काही प्रमाणात कठीण, तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना भरभरून गुण, अशी या निकालाची वैशिष्ट्ये सांगता येतील. (12th hsc board result announced jalgaon news )

रायसोनी महाविद्यालय

जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कशिश भागवानी ९१.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली. श्रीपालचंद जैन (९१.३३) द्वितीय, प्रियांशी जोशी (९०.३३) तृतीय आली. विज्ञान शाखेतून निदा अमन शेख प्रथम (८४.८३), नमन गांधी (८३) द्वितीय, तर तन्मय जैन (८१.३३) तृतीय आला. रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

धनाजी नाना चौधरी विद्यालय

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.६३ टक्के लागला. विद्यार्थी यश आगीवाल (८४.३३) प्रथम, शुभम रडे (७९.८३) द्वितीय, तर देवेंद्र सदाफळे (७९) तृतीय आला. ३८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष, आमदार शिरीष चौधरी, सचिव प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. प्रीती बोंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

महाराणा प्रताप विद्यालय

महाराणा प्रताप विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८७.१४ टक्के लागला. विद्या सुरवाडे (७८.८३) प्रथम, खुशी श्रीवास्तव (७६) द्वितीय, तर तुषार साळवे व विशाल सोनवणे (७५.६७) तृतीय आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा रत्ना जैन, सचिव अशोक खिंवसरा, कोशाध्यक्ष प्रमोद खिंवसरा, मुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छत्रपती शिवाजी महाविद्यालय

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. साक्षी शिंदे (८९.१६) प्रथम, महेश भोरटके (८८.६६) द्वितीय, रिद्धी पाटील (८८.३३) तृतीय, वैभव महाजन व तेजस्विनी जाधव (८७.६६) चतुर्थ व स्वराज पाटील (८७.५०) पाचवा आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. व्ही. पाटील, सचिव मालती पाटील, प्राचार्य समाधान धनगर यांनी अभिनंदन केले.

आयडीयल महाविद्यालय

आयडीयल इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. महाविद्यालयाचा अनिल बारेला (७५.६७) प्रथम, विशाल तडवी (७४) द्वितीय, निशा बारेला (७३) तृतीय आली. संस्थाध्यक्ष आबासाहेब पाटील, सचिव व नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

गुणवंत्तांची अशीही कामगिरी

ऐश्‍वर्य चोपडाला ९७ टक्के

एम. जे. कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ऐश्वर्य चोपडा ९७ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. त्याला अकउंट्समध्ये १०० पैकी १००, गणित १०० पैकी १००, माहिती तंत्रज्ञान १०० पैकी १०० गुण मिळाले. त्याची आई रेशमा (हेमलता), वडील नितीन, आजोबा मोहनलाल चोपडा यांच्यासह गुरुजन व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, बहीण समीक्षा व गरिमा यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT