online fraud esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : क्रिप्टो करन्सीच्या नावे तरुणाला गंडविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून त्यात नफा मिळवण्याचे आमिष देत जळगाव शहरातील देवीदास कॉलनी येथील तरुणाची तब्बल १५ लाख ३५ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. (15 Lakh online fraud of young man by luring him to invest in cryptocurrency jalgaon fraud crime)

याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, जळगाव शहरातील देवीदास कॉलनीत पवन बळिराम सोनवणे (वय २५) हा तरुण वास्तव्यास आहे. बुधवार (ता. १२ ते २२ एप्रिल २०२३) दरम्यान पवन यास व्हॉट्सॲप, तसेच टेलिग्राम या सोशल मीडिया साइटवर अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधत अनोळखी व्यक्तींनी पवन याला भूलथापा देत विश्वास संपादन केला.

तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा प्राप्त करून देतो, असे आमिष, तसेच खोटे आश्वासन संबंधितांनी पवन यास दिले. पवन याच्याकडून संबंधितांनी वेळोवेळी तब्बल १५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन स्वीकारली. त्या मोबदल्यात कोणतीही रक्कम पवन यास परत केली नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवन सोनवणे याने याबाबत मंगळवारी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अनोळखी क्रमाकांवरून संपर्क साधणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : रांची येथे JPSC-JSSC उमेदवारांचे आंदोलन

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT