Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : मुक्ताईनगर येथे 16 मोटारसायकली जप्त; मुंबईच्या पोलिस पथकाने केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : येथे मुंबई शहरातून चोरी केलेल्या तब्बल १६ मोटारसायकली जप्त करण्याची कारवाई मुंबईच्या पोलिस पथकाने केली असून, तालुक्यातील वडवे येथील आरोपी सुनील सुभाष चौधरीच्या अटकेनंतर या मोटारसायकलींचा तपास लागला. पोलिस पथक तळ ठोकून असल्याने अजून मोटारसायकली जप्त होणार असल्याची शक्यता आहे.

तालुक्यातील वढवे येथील आरोपी सुनील चौधरी (वय २८, हल्ली मुक्काम बदलापूर, जिल्हा ठाणे) याला सीसीटीव्हीच्या आधारे मोटारसायकल चोरी केल्यानंतर नगर मुलुंड पूर्व येथील पोलिस पथकाने ताब्यात घेतले होते. (16 Two Wheeler seized at Muktainagar Mumbai police team took action Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्याची चौकशी केल्यानंतर मुक्ताईनगर शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मोटारसायकली विकल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार मुंबई पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश सानप, योगेश सोळुंके, सुरेश पाटील, सचिन चव्हाण, जितेंद्र मोरे, मंगेश दंडगव्हाळ या पथकाने कारवाई करत मुक्ताईनगर शहरातून तब्बल १६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. मोटारसायकल विकत घेणाऱ्यांनादेखील मुंबई पोलिसांनी चौकशीची नोटीस दिली असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT