जळगाव

Vidrohi Sahitya Sammelan 2023 : अमळनेरला 18 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

विद्रोही साहित्य संमेलनाच्या आढावा बैठक तसेच पत्रकार परिषदेवेळी उपस्थित विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

सकाळ वृत्तसेवा

Marathi Sahitya Sammelan Jalgaon : अमळनेरात ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य, शेतकरी, श्रमिक, महिला, दलित, आदिवासी तसेच बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. (18th Rebel Marathi Literary Conference will be in amalner jalgaon news)

येथील धनदाई महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी यांनी सांगितले की,प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लिंग-जात-वर्ग वर्चस्ववादी साहित्य व्यवहारांना, सरकारी पैशांवर होणाऱ्या उधळपट्टीला,समाजाच्या वास्तव प्रश्नांकडे दुर्लक्ष करून समाजात होत असणाऱ्या विषमतावादी व सामाजिक न्याय डावलणाऱ्या घटनांवर ‘ब्र’ शब्द न काढता चंगळवादी संस्कृतीचा पुरस्कार करत मनोरंजन प्रधान स्वरूपाला आमचा विरोध असून हा विरोध महात्मा ज्योतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठवलेल्या पत्रावर आधारित आहे.

हे पत्र हाच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जाहीरनामा आहे. अमळनेरची भूमी ही पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी भूमी आहे. साने गुरुजी सारखे शेतकरी व कष्टकऱ्यांची भावना आपल्या साहित्यातून मांडणारे व कामगारांची आंदोलने उभी करणारे लेखक या भूमीत होऊन गेले.

क्रांतिसिंह उत्तमराव पाटील, क्रांतीवीरांगणा लीलाताई पाटील यांची ही क्रांती भूमी आहे. शाहीर साबळेंसारख्या महाराष्ट्र शाहिरांची जडणघडण या मातीत झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा वारसा आपल्या जीवनात घेऊन वावरणारे अमळनेरवासी हे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी करतील याची आम्हास खात्री असल्याचे प्रा.परदेशी यांनी सांगितले.

या प्रसंगी मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, ज्येष्ठ विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेचे मंसाराम पवार, एल. जे. गावित, नगरसेवक घनश्याम पाटील, धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत लेखक व प्रकाशक प्रा. गौतम निकम, शेतकरी कार्यकर्ते अरुण देशमुख, सेवानिवृत्त विस्ताराधिकारी अशोक बिऱ्हाडे, डी. ए. पाटील, प्रा. डॉ. राहुल निकम, अजिंक्य चिखलोदकर, गौतम सपकाळे, अजय भामरे, संजय सूर्यवंशी, प्रेमराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रा.अशोक पवार यांनी अमळनेरकर विद्रोही संमेलन यशस्वी करतील, असे सांगत बैठकीचा समारोप केला. या प्रसंगी बापूराव ठाकरे यांनी संमेलनासाठी ११ हजार रुपये योगदान रोखीने दिले. यावेळी विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT