Bribe crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : शेळी पालनासाठी दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रूपयांची लाच स्विकारताना येथील वसंतराव नाईक भटके विमुक्ती जाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व कंत्राटी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. (2 arrested for taking bribe jalgaon crime news)

जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक (वय ५५) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल (वय ३४) अशी या दोघांची नावे आहेत. बोरावल (ता. यावल) येथील तक्रारदाराने महामंडळाच्या कार्यालयात शेळीपालनासाठी १ लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले होते. त्यापैकी ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला.

उर्वरीत २५ हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक नाईक यांनी सोमवारी (ता. ४) स्वतःसाठी ३ हजार व कंत्राटी सेवक कडेवाल यांच्यासाठी २ हजारांची लाच मागितली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावर तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून मंगळवारी (ता. ५) कार्यालयातच दोघांना लाच घेतांना पकडण्यात आले.

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकुर, राकेश दुसाने यांच्यासह पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

SCROLL FOR NEXT