bike accident latest marathi news esakal
जळगाव

Jalgaon : तरसोद फाट्यावर ट्रकची दुचाकीला धडक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(2 bikers got injured due to Hit by truck at tarsod fata jalgaon latest news)

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी अक्षय वासुदेव कुकरेजा (वय २४) हा त्याचा मित्र अमित पहुजा याच्यासोबत दुचाकीने नशिराबादकडून जळगावच्या दिशेने येत होता. रात्री दीडच्या सुमारास तरसोद फाट्याजवळ टायर कंपनीच्या गोडाउनसमोरच जळगावकडून येणाऱ्या सुसाट ट्रकने अक्षय कुकरेजा याच्या दुचाकीला समोरून धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार अक्षय व दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र अमित पाहुजा हे दोघे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार अक्षय कुकरेचा याच्या तक्रारीवरून रविवारी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT