Crime news esakal
जळगाव

Jalgaon News : शिपायाच्या नोकरीसाठी मुख्याध्यापकाच्या घरावर धिंगाणा... ठार मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : वरणगाव येथील ऑर्डिन्स फॅक्ट्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या घरावर दोन दारूड्यांनी हल्ला चढवून धिंगाणा घातला. (2 drunkards attack headmasters house for peon job jalgaon news)

विद्यालयात शिपाई म्हणून नोकरीला लावा, यासाठी गुरुवारी (ता. २९) रात्री मुख्याध्यापक महेंद्र भोईटे यांच्या कोल्हेनगरातील घराच्या कंपाऊंडमध्ये उभ्या दोन दुचाकीसह कारची नासधूस दोघांनी केली.

वरणगाव ऑर्डिन्स फॅक्टरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक महेंद्र वसंतराव भोईटे (वय ५४) पत्नी संगीता, मुलगी भाग्यश्री यांच्यासह कोल्हेनगरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास भोईटे कुटुंब झोपले असताना, कल्पेश संभाजी भोईटे (रा. दादावाडी) व त्याच्यासोबत एक अनोळखी, असे दोघे महेंद्र भोईटे यांच्या निवासस्थानी आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कारण नसताना शिवीगाळ करत आरडाओरड केली. नंतर घरात उभी दुचाकी (एमएच १९, सीएन ६५५०) व इलेक्ट्रीक मोपेड फोडली. नंतर घराबाहेरील कार (एमएच १९, सीव्ही ६५५०)वर घरातील कुंड्या उचलून फेकत नासधूस केली. घरावर दगडफेक करून घराच्या खिडक्या तोडल्या.

नंतर त्या दोघांनी महाबळ कॉलनीतील रहिवासी प्रमोद जयवंतराव काळे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. विनाकारण शिवीगाळ करत त्यांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ केली. याबाबत रामानंदनगर पेालिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT