Gang Fight esakal
जळगाव

Jalgaon : ‘पारलेजी’ म्हणून चिडविले अन् दोन गट आपसांत भिडले

रईस शेख

जळगाव : भादली गावातील एका तरुणाला ‘पारलेजी’ (Parle G) नावाने चिडविल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी (Fight) झाल्याची घटना रविवारी (ता. २२) घडली. नशिराबाद पोलीसात या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन गटाच्या वादामुळे भादली गावात तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने वाद निवळला. (2 groups clashed over calling Parle G Jalgaon crime news)

पहिल्या गटाच्या तक्रारीनुसार, भादली बुद्रुक (ता. जळगाव) येथे समीर दादामिया पटेल हा तरूण रविवारी सायंकाळी पाच वाजता गावातील राममंदीर चौकातून चुलत भावासह बाजारात जात होता. त्यावेळी गावातीलच गणेश काटे, भूषण कोळी, रितेश कोळी, मोहित कोळी सर्व (रा. भादली, बुद्रुक ता. जि. जळगाव) यांनी समिरचा चुलत भावाला ‘पारलेजी’ म्हणून चिडविले. याचा जाब विचारला असता चौघांनी दोघा भावंडाना बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी समीर पटेल यांच्या तक्रारी वरून गणेश काटे, भूषण कोळी, रितेश कोळी, मोहित कोळी यांच्या विरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीनुसार, भूषण कोळी हा गावातील राममंदीराजवळून बाजारात जात असताना ‘पारलेजी’ चिडविल्याच्या कारणावरून समीर दादामिया पटेल, हुसेन बिस्मिल्ला पटेल, परवेज अनीस पटेल आणि अदनान जाकीर पिंजारी (सर्व रा. भादली बुद्रुक, ता. जि. जळगाव) यांनी भूषण कोळी याला बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी भूषण कोळी यांच्या फिर्यादीवरून समीर दादामिया पटेल, हुसेन बिस्मिल्ला पटेल, परवेज अनीस पटेल आणि अदनान जाकीर पिंजारी यांच्या विरोधात नशिराबाद पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT