cyber crime fraud news
cyber crime fraud news esakal
जळगाव

Jalgaon Cyber Crime : KYCच्या लिंकद्वारे 2 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चिंचोली येथील तरुणाच्या बँक खात्यातून एक लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (2 Lakh fraud through KYC link Jalgaon Cyber ​​Crime News)

चिंचोली येथील प्रमोद नामदेव पाटील (वय ३९) खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ ऑक्टोबरला सकाळी साडेसातला त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून युनो केवायसी अपडेट करण्यासंदर्भात लिंक पाठविण्यात आली होती. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर दिलेल्या फॉर्ममध्ये पॅनकार्ड, आधारकार्ड आणि मोबाईलवरील ओटीपी क्रमांक भरला. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर एक लाख ९० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रविवारी (ता. ३०) दुपारी एकला एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT