accident news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : भरधाव दुचाकी खांबाला धडकली; 2 तरुण ठार

भुसावळ येथून दुचाकीवर ट्रीपल सीट जामनेरकडे भरधाव येत असताना खड्डा चुकविताना गाडी खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : भुसावळ येथून दुचाकीवर ट्रीपल सीट जामनेरकडे भरधाव येत असताना खड्डा चुकविताना गाडी खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे.

हे तिघेही जामनेर तालुक्यातील रहिवासी असून, ही घटना गंगापुरी फाट्याजवळ गुरुवारी (ता. २१) रात्री बारा ते शुक्रवारी एकच्या दरम्यान घडली.(2 youths were dead on spot after speeding bike hit pole jalgaon accident news)

भुसावळ येथून दत्ता ढोणे, प्रशांत पाटील, अंकुश दळवे हे तिघे मित्र दुचाकीवर जामनेरकडे येत होते. रात्री बारा ते एकच्या दरम्यान भरधाव येत असताना गंगापुरी फाट्याजवळ खड्डा चुकविताना दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्याचवेळी तिघे रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर लगेच अंकुश दळवे याने गावातील मित्रांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली.

या भीषण अपघातात दत्ता आनंदा ढोणे (वय २१, नेरी बुद्रूक, ता. जामनेर), प्रशांत अण्णाराव पाटील (वय २३, देवपिंप्री) हे दोघे मृत झाले आहेत तर अंकुश मधुकर दळवे (वय २०, देवपिंप्री वसाहत) हा जखमी आहे. ढोणे दुचाकी (एमएच १९, इबी ७६६६) चालवीत होता तर पाटील व दळवे मागे बसलेले होते.

देवपिंप्री येथील मित्र व ग्रामस्थांनी रुग्णवाहिका चालक जालमसिंग राजपूत यांना माहिती कळविताच त्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत तिघा जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी दत्ता ढोणे व प्रशांत पाटील यांना मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT