farmer strick
farmer strick esakal
जळगाव

Farmer Protest : शेतकरी जनआक्रोश मोर्चात दोनशेवर ट्रॅक्टरचा सहभाग; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार नेतृत्व

सकाळ वृत्तसेवा

Farmer Protest : राज्य सरकारचे शेतकरी विरोधी व कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) गुरुवारी (ता.३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चात दोनशेवर ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी होणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मोर्चाचे नेतृत्व करतील.(200 tractors participate in farmers protest jalgaon news)

माजीमंत्री गुलाबराव देवकर व जिल्हाध्यक्ष ॲड्. रवींद्र पाटील यांनी मोर्चाच्या नियोजनाबद्दलची माहिती बुधवारी (ता. २९) सायंकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रदेश निरीक्षक शेखर माने, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, रिकू चौधरी आदी उपस्थित होते.राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील सकाळी साडेसहाला जळगावमध्ये येतील.

सकाळी अकराला पत्रकारांशी ते संवाद साधतील. त्यानंतर दुपारी एकला जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा निघेल. अजिंठा चौक, वैकुंठधाम, नेरीनाका, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यचौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचेल.

त्याठिकाणी होणाऱ्या सभेने मोर्चाचा समारोप होईल. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. मोर्चात माजीमंत्री व आमदार एकनाथ खडसे, श्री. देवकर, माजीमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT