Nashik Farmer Protest : दिंडोरीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा

farmer strick
farmer strickSakal

Nashik Farmer Protest : अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने भरपाई द्यावी, यासह विविध प्रश्नांवर सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने एक डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दिंडोरीत शेतकरी आक्रोश मोर्चा होणार आहे.(Farmer protest march of NCP in Dindori nashik news)

अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी, पीक विमा योजनेचे निकष बदलावे, किमान अडीच ते तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळावी, कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लादण्यात आले असून, हे शुल्क कमी करावे, आदी मागण्यांसाठी सरकाला जाब विचारण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकूळ पिंगळे यांनी दिली.

माजी आमदार नितीन भोसले, राजेंद्र मोगल, जिल्हा सरचिटणीस मुन्ना अन्सारी, ॲड. तुषार जाधव आदी उपस्थित होते. शेतकरी आक्रोश मोर्चात ५०० हून अधिक ट्रॅक्टर सहभागी होऊन त्यांची रॅली प्रांत कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

farmer strick
Nashik Farmer Protest : आश्‍वासनानंतर अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार

तेथून रॅलीचा समारोप संस्कृती लॉन्स दिंडोरी येथे सभेत होईल. सभेला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, जितेंद्र आव्हाड आदी मार्गदर्शन करणार आहे.

नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, कर्जमाफी द्यावी, बेरोजगारांना स्थानिक औद्योगिक वसाहतींमध्ये प्राधान्याने नोकरी द्यावी, सुरत-चेन्नईसाठी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर संबंधित शेतकऱ्यांना मोबदला द्यावा या मागण्या देखील केल्या जाणार आहेत.

farmer strick
Nashik Farmers Protest : सदोष निवाड्याविरोधात चक्का जामचा इशारा; सुरत-चेन्नई बाधितांचे मोर्चातून शक्तिप्रदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com