2200 hectares of bananas destroyed in raver due to hurricane  esakal
जळगाव

Banana Crop Damage : रावेरला 2200 हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त; वादळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Banana Crop Damage : तालुक्यात आठ जूनला चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे ३४ गाव शिवारातील २२०० हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सुमारे ९९ कोटीच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण होऊन अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. (2200 hectares of bananas destroyed in raver due to hurricane jalgaon news)

तालुक्यात ८ जूनच्या सायंकाळी जोरदार चक्रीवादळासह पावसाचा तडाखा बसला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेले केळी पीक जमिनदोस्त होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरवला होता. कृषी विभागातील कमी कर्मचारी संख्याबळ असल्यामुळे तब्बल एक महिना वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यास लागला.

या चक्रीवादळाचा तडाख्यात रावेर, खिरोदा प्र. रावेर, आहिरवाडी, मंगरुळ व मुंजलवाडी येथील केळी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मे व जून महिन्यात तब्बल पाच वेळा वादळी वाऱ्यासह गारपीट, पावसाचा तडाखा बसला.

यामुळे तालुक्यातील केळी पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होऊन केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भारपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : रावेर - ३८५, खिरोदा (प्रगणे रावेर) २६१, अहिरवाडी - १८५, मंगरूळ -२०४, मुंजलवाडी -१२४, निरूळ -१६९, कुसुंबा बुद्रुक -११५, पिंप्री - ८९, केऱ्हाळे खुर्द -८९, मोहगण - ९८, पाडळे बुद्रुक -१०५, केऱ्हाळे बुद्रुक -६५, कुसुंबा खुर्द - ६५, रसलपूर - ८८, उटखेडा - ९४, अभोडा बुद्रुक -४६, पाडळे खुर्द -६६, खानापूर - ५४, जिन्सी - ३४, भाटखेडा - ७३,

नांदुरखेडा - २८, जुनोने - १९, कर्जोद -२८, अजनाड- २७, पुनखेडा- ०३, चोरवड - १३, होळ - १३, अभोडा खुर्द - ०७, भोर - ०९, विवरे बुद्रुक -११, भोकरी - ०१, वाघोड - ०१, पातोंडी - ०२. अशा ३४ गाव शिवारातील २७३९ शेतकऱ्यांच्या २२३०.५३ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे एकूण ९९ कोटी, १२ लाख ४७ हजार, ५३२ रुपयांचे नुकसानीचा पंचनामा महसूल, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी करून सदर अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT