Money fraud esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime: कर्नाटकच्या भामट्याचा प्रौढास 25 लाखांचा चुना; नर्सरीच्या रोपांसाठी घेतली रक्कम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : नर्सरी उद्योगासाठी (गार्डन डेव्हलपिंगच्या) लागणाऱ्या झाडांचे रोप पुरविण्याच्या नावाखाली वेळोवेळी रक्कम बँक खात्याद्वारे घेऊन कर्नाटकच्या भामट्याने जळगावच्या प्रौढाला तब्बल २५ लाखांचा चुना लावला.

याबाबत विद्युत कॉलनीतील रहिवासी दीपक बळिराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (25 Lakhs stolen from man Criminal from Karnataka Amount taken for nursery plants Jalgaon Fraud Crime)

दीपक चौधरी चार वर्षांपासून गार्डन डेव्हलपिंगच्या व्यवसायात आहे. बऱ्यापैकी शास्त्रीय माहिती आणि ग्राहकांची मागणी असलेले दुर्मिळ, उपयोगी रोपांचा ते पुरवठा करतात. त्यांच्याकडे सागवान झाडाच्या रोपांची मोठी ऑडर होती.

व्यवसायानिमित्त त्यांनी कर्नाटकसह इतर राज्यांतूनही रोपे यापूर्वी मागवली आहेत. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक दौऱ्यात आणलेला माल हातोहात त्यांनी विक्री केला. वारंवार केवळ मालखरेदीसाठी कर्नाटकात जाण्याऐवजी तेथील रोप विक्रेत्यांच्या संपर्कात येऊन ओळखही झाली होती.

५ जानेवारी २०२२ ला कर्नाटकातील शंकर गवळा (रा. चित्रदुर्ग) यांच्याशी संपर्क साधला व आपली ऑर्डर त्यांना कळविली. त्यापोटी शंकर गवळा याच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये रोख टाकून सागवान झाडांच्या रोपांची बुकिंग फायनल केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर...

दीपक चौधरी यांनी शंकर गवळा याला १५ लाख रुपयांची रोपे बुक केल्यावर ते निश्‍चिंत होते. मात्र, आठ दिवस उलटूनही माल येत नाही, म्हणून त्यांनी चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे संबंधितांना फोन केला.

त्या वेळी तिकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आल्यावर चौधरी यांनी पुन्हा आठ लाख ५० हजार रुपये सागवानचे व इतर झाडे घेण्यासाठी बोलविले. त्यासाठी त्यांनी एक लाख ५० हजार रुपयांचे झाडे विकत घेतली.

त्यानंतर झाडे लागणार असल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून मागणी सांगितली. त्या वेळी त्या व्यक्तीने बँक खात्यावर १५ लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ही रक्कम १९ जानेवारी २०२२ ला पाठविली. त्यानंतर आठ दिवस प्रतीक्षा केली, झाडे आलीच नाहीत.

त्यामुळे पुन्हा विचारणा केली असता, त्याने पूर्ण पैसे देण्याचे सांगितले. त्यानुसार पुन्हा आठ लाख पाच हजार रुपये दिले. असे (१९ जानेवारीपासून आजपर्यंत) एकूण २५ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याचे आढळून आले.

याबाबत दीपक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात शंकर गवळा (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार संजय सपकाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT