Missing esakal
जळगाव

गेंदालाल मिल परिसरातून तरूण बेपत्ता

रईस शेख

जळगाव : शहरातील शिवाजीनगर गेंदालाल मिल परिसरातून २८ वर्षीय तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. विजय शंकर लोखंडे (वय २८, रा. गेंदालाल मिल) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.

विजय लोखंडे हा आपल्या कुटुंबीयांसह गेंदालाल मिल परिसरात वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. २५) रोजी सकाळी ११ वाजता विजय हा घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला. सायंकाळी घरी न आल्याने त्याच्या आईसह कुटुंबीयांनी परिसरात नातेवाईक व मित्र मंडळी यांच्याकडे तपास केला असता तो, कुठेही आढळून आला नाही. विजयची आई सुमन लोखंडे यांनी सोमवारी (ता. २७) रोजी सायंकाळी साडेसात वाजता शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गौतम केदार करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी अखेर निर्दोष, अमित शहा मानहानी प्रकरणात सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, लोकलचा १५-२० मिनिटं खोळंबा

Ashirvad Sooryavanshi Century: १९ चौकार, ६ षटकार... ११९ चेंडूंत १६८ धावा! वैभव सूर्यवंशीच्या भावाने गाजवले मैदान Video

राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

Pune News: पुणेकरांना दिलासा! जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त; रखडलेल्या जमीन मोजण्या पुन्हा सुरू होणार

SCROLL FOR NEXT