arrest esakal
जळगाव

रस्त्यात जबरी लूट करणारे तिघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार - जीवन चव्हाण

चाळीसगाव : चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला तिघांनी जबरी लुटल्याची घटना वाघळी, हिंगोणे रस्त्यावर शनिवार रोजी रात्री ९:३० वाजता घडली होती. याप्रकरणी पोलिसात नोंद होताच ग्रामीण पोलिसांनी तपासाचा चक्र फिरवत अवघ्या सहा तासात संशियितांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील विशाल संजय लिंगायत (वय-२२) हा तरुण वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. एका दुकानावर पाववड्याची विक्री करून तो कुंटुंबाची गुजराण करतो. दरम्यान शनिवार, २५ जून रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तो आपल्या बुलेटने (एम.एच. १९ एक्यू ६४६४) जामनेरकडे जात होता. तेव्हा वाघळी-हिंगोणे शिवारातील चक्रधर मंदिराजवळ मागून आलेल्यांनी त्याची दुचाकी अडवली. व लिंगायतला बाजूच्या शेतात ओढत घेऊन गेले.

तिघांनी चाकूचा धाक दाखवून खिश्यातील २७ हजार रुपये रोख व ११ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. याप्रकरणी लिंगायतच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार सपोनि रमेश चव्हाण हे करीत होते. त्यांच्यासह पथकांनी संशियित आरोपींचा शोध घेऊन अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले. राजेंद्र पाटील (वय-३०), जयेश उर्फ सानी सोमनाथ चव्हाण (वय-१९), ओंकार उर्फ सत्यम राजेंद्र महाजन सर्व रा. पातोंडा ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या संशियित आरोपींची नावे आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT