bike thief esakal
जळगाव

पुन्हा 3 मोटारसायकली लंपास; वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

रईस शेख

जळगाव : जळगाव शहरातून सोमवारी (ता. २७) तीन मोटारसायकल चोरुन (Bikes Theft) नेल्याचे तीन स्वतंत्र गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यात गांधीनगरातील नटराज सिनेमा जवळून एक, शाहुनगरातून दुसरी आणि वसंतवाडी येथून तिसरी मोटारसायकल चोरट्यांनी चोरुन नेल्याप्रकरणी तीन पोलिस ठाण्यात गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहे. (3 motorcycle stolen Crimes filed in different police stations Jalgaon Crime News)

जिल्‍हापेठ पोलिसांत दाखल गुन्ह्यातील तक्रारदार नितीन रामेश्वरलाल जागीड (वय २३, रा. वाघनगर), रविवारी सकाळी १० वाजता दुचाकीवरून (एमएच १९ बीव्ही ८७०२) नटराज सिनेमाजवळ आला होता, दुचाकी उभी केलेल्या जागेवरून चोरट्यांनी चोरुन नेली. शेख जावेद शेख चाँद (वय ३३, रा.चोपडा) गुरुवारी (ता. २३) शाहूनगर येथील फॉर्च्युन फायनान्स येथे आले होते. त्यांची पार्किंगमध्ये उभी असलेली (एमएच १९ बीएल ०१७२) दुचाकी चोरुन नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तर, अरुण काशिदास जगताप-सोनार (वय ५३, रा. वसंतवाडी) यांच्या मालकीची होंडा शाईन (एमएच १२ टीजी २६३०) घरासमोरून चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक युनूस तडवी, मिलिंद सोनवणे, गजानन बडगुजर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT