arrested esakal
जळगाव

Jalgaon : रस्त्यात जबरी लूट करणारे तिघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला तिघांनी लुटल्याची (Robbery) घटना वाघळी, हिंगोणे रस्त्यावर शनिवारी (ता. २५) रात्री ९:३० वाजता घडली होती. याप्रकरणी पोलिसात नोंद होताच ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या सहा तासात संशयितांना अटक केली आहे. (3 robbers arrested in road robbery jalgaon Crime News)

याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील विशाल संजय लिंगायत (वय २२) हा तरुण वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. एका दुकानावर पाववड्याची विक्री करून तो उदरनिर्वाह करतो. दरम्यान शनिवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तो आपल्या बुलेटने (एमएच १९ एक्यू ६४६४) जामनेरकडे जात होता. तेव्हा वाघळी-हिंगोणे शिवारातील चक्रधर मंदिराजवळ मागून आलेल्यांनी त्याची दुचाकी अडवली. व लिंगायतला बाजूच्या शेतात ओढत घेऊन गेले. तिघांनी चाकूचा धाक दाखवून खिश्यातील २७ हजार रुपये रोख व ११ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.

याप्रकरणी लिंगायतच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार सपोनि रमेश चव्हाण हे करीत होते. त्यांच्यासह पथकांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन अवघ्या सहा तासात ताब्यात घेतले. राजेंद्र पाटील (वय ३०), जयेश उर्फ सानी सोमनाथ चव्हाण (वय १९), ओंकार उर्फ सत्यम राजेंद्र महाजन सर्व (रा. पातोंडा ता. चाळीसगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT