Vishal Firke, Vijay nhavi, Sumedh Talvelkar esakal
जळगाव

Shiv Chhatrapati Sports Awards : जिल्ह्यातील तिघे ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा’चे मानकरी!

सकाळ वृत्तसेवा

Shiv Chhatrapati Sports Awards : राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्करांची शुक्रवारी (ता. १४) घोषणा करण्यात आली.

त्यात जळगावच्या तीन खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला, तर किशोर चौधरी यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झाला आहे. (3 winners of Shiv Chhatrapati Sports Award from district jalgaon news)

राज्य शासनाकडून दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षांचे पुरस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केले आहेत.

२०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांतील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यातील चौघांचा गौरव

२०२१-२२ या वर्षाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार किशोर प्रल्हाद चौधरी (सॉफ्टबॉल), तर २०१९-२० या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू हा पुरस्कार विजय लक्षमण न्हावी (आट्यापाट्या) आणि २०२०-२१ या वर्षासाठी विशाल निवृत्त फिरके (आट्यापाट्या) व २०२१-२२ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू हा पुरस्कार सुमेध प्रदीप तळवेलकर (सॉफ्टबॉल) यांना मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT