Jalgaon Crime News esakal
जळगाव

पाचोरा येथे पिस्तूल बाळगणाऱ्या चौघांना अटक

चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जि. जळगाव) : येथील भडगाव रोड परिसरात पिस्तूल (Pistol) बाळगत कारमध्ये फिरणाऱ्या चौघांना पाचोरा पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (4 arrested for carrying pistols in Pachora Jalgaon Crime news)

भडगाव रोड परिसरातून काही तरुण कारमधून शस्त्रास्त्र नेत असल्याची माहिती पोलिस हवालदार योगेश पाटील यांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक गणेश चौभे, हवालदार सुनील पाटील, योगेश पाटील, प्रवीण परदेशी, समीर पाटील या पोलिस पथकाने भडगाव रोड परिसरात फिरून वाहनांची तपासणी सुरू केली. भडगाव रोड भागातील समर्थ व्हॅलीजवळ मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास एमएच १९ एएक्स ९८११ क्रमांकाची इंडिका कार थांबवून चौकशी केली असता कारमधील चौघांनी भयभीत होऊन उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी चौकशी व तपासणी केली असता त्यांच्याजवळ राखाडी रंगाचे कव्हर लावलेली २५ हजार रुपये किमतीची पिस्तूल मिळून आली.

पिस्तूल बाळगणाऱ्या भैय्या निकुंभे (वय २५) रोहित झोगडे (वय २२, रा. नाशिक), नितीन नासरे (वय २७, रा. अकोला) व सचिन पाटील (वय ३२, रा. पाचोरा) या चौघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी २५ हजार रुपयांची पिस्तूल व २ लाख ५० हजार रुपयांची इंडिका कार जप्त केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT