crime fraud news  esakal
जळगाव

Fraud Crime : पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 4 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : अवघ्या सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून एका शेतकऱ्याची चार लाखांत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील उंबरखेडे येथे बुधवारी (ता. १४) उघडकीला आली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (4 lakh stolen from farmer with lure of doubling money Jalgaon Fraud Crime Latest Marathi News)

तालुक्यातील उंबरखेडे येथील पुंडलिक डौलत पाटील (वय ६२) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, पुंडलिक पाटील यांना २०१० मध्ये एकाने फोनवर कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून सहा महिन्यात आपले पैसे दुप्पट करून देतो, असे सांगितले. गुंतवणूक करायची असेल तर संबंधित क्रमांकावर फोन करण्यास सांगितले.

त्यानंतर पाच दिवसांनी या क्रमांकावर फोन करून पाटील यांनी पैसे गुंतवणूक करण्याबाबत होकार दिला. यानंतर संबंधितांनी अक्सीस बँकेचा अकाउंट क्रमांक ८०५०१०१००००१२३६ पाठवून यावर नोंदणी करण्यासाठी सांगितले. त्यावर पाटील यांनी तत्काळ २ हजार रुपये देऊन नोंदणी केली. त्यानंतर पाटील यांनी सलग चार वेळा विविध कारणांसाठी एकेक लाख रुपये संबंधिताच्या खात्यावर वर्ग केले.

याबाबत पाटील यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली तर आजपर्यंत संजय विठोबा उमाटे (रा. प्रगतिशील कॉलनी, वर्धा रोड, नागपूर) नामक व्यक्तीचा तपास लागलेला नसून तो पैसे घेऊन पसार झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचे कळताच पुंडलिक डौलत पाटील यांनी १४ सप्टेंबर २०२२ ला दुपारी एकच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलिस ठाणे गाठून वरील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT