Chimanrao Patil esakal
जळगाव

Jalgaon News : एरंडोल-पारोळा मतदारसंघासाठी 40 कोटींचा निधी; रस्ते, पुलांची कामे होणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात एरंडोल-पारोळा मतदारसंघातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी सुमारे ४० कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

मंजूर झालेल्या निधीतून मतदारसंघात रस्ते आणि पुलांची कामे करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (40 crore fund for Erandol Parola constituency jalgaon news )

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून, यामध्ये सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात मतदारसंघातील रस्ते आणि पुलांसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये पारोळा तालुक्यातील देवगावजवळ पुलाच्या बांधकामासाठी ९८ लाख ३५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच अमळनेर नाका ते शनी मंदिरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तीन कोटी रुपये, शिरसमणी ते तालुका हद्दीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी, पारोळा ते पुनगाव रस्त्याच्या पुलासह दुरुस्तीसाठी दोन कोटी, कान्हेरे ते सावखेडा रस्ता दुरुस्ती तीन कोटी, भोंदण ते चोरवड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाख, मुंदाणे प्र.अ. ते सोके रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसह रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अंजनी नदीवरील पुलाच्या नवीन बांधकामासाठी ५ कोटी ६० लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग ते सावदा रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ८० लाख, राष्ट्रीय महामार्ग ते जवखेडे रस्ता दुरुस्ती १ कोटी, फरकांडे ते लोणी रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ५० लाख, कासोदा ते जवखेडेसीम रस्ता दुरुस्ती ९० लाख, तळई ते अंतुर्ली रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २० लाख मंजूर करण्यात आले आहेत.

भडगाव तालुक्यातील गिरड गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी, भातखंडे गावाजवळ पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाख, पिंपरखेड आंचळगाव रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम २ कोटी ५० लाख अशा मतदारसंघातील पूल आणि रस्त्यांच्या कामांसाठी ४० कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

..अशी आहे तरतूद

सद्यस्थितीत मतदारसंघात सुमारे पंधराशे कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, अनेक कामे पूर्ण झाली आहेत. पुरवणी अर्थसंकल्पात पारोळा तालुक्यासाठी १९ कोटी ४८ लाख ३५ हजार रुपये, एरंडोल तालुक्यासाठी सुमारे तेरा कोटी रुपये तर भडगाव तालुक्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांच्या रस्ते आणि पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT