41 gates open of Hatnur Dam Sakal
जळगाव

Rain Update : हतनूर धरणाचे पुन्हा 41 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीला पूर आलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात रविवारी (ता. १७) रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. यामुळे गिरणा धरण शंभर टक्के भरले आहे. तर हतनूर (ता. भुसावळ) धरणातही प्रचंड पाणीसाठा झाल्याने धरणाचे ४१ दरवाजे पूर्णक्षमतेने उघडले आहेत. तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीला पूर आलेला आहे. (Latest Marathi News)

सततच्या पावसामुळे हतनूर धरणाचे ४१ दरवाज्यांपैकी ३६ दरवाजे पूर्ण उंचीने उघडलेले आहेत. तापी नदीपात्रामध्ये सद्य:स्थितीत एक लाख क्यूसेस पाणी विसर्गातून सोडण्यात येत आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नाले, ओढे काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT