Drip Pipes esakal
जळगाव

जळगाव : शेतातून 45 हजारांच्या ठिबक नळ्या चोरी

रईस शेख

जळगाव : भोकर (ता. जळगाव) शिवारातील शेतातून चोरट्यांनी ४५ हजार रुपये किंमतीच्या ठिबक (Drip) नळ्या चोरून नेल्याची घटना घडली. तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (45000 drip pipes stolen from the field Jalgaon News)

जळगाव तालुका पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, दत्तात्रय नथू सोनवणे (वय ५४, रा. भोकर, ता. जळगाव) कुटुंबीयांसह वास्तव्याला असून शेती व्यवसाय करतात. भोकर शिवारात शेत गट क्रमांक (३७६)मध्ये शेत आहे. त्याठिकाणी त्यांनी ४५ हजार रुपये किमतीची २० हजार मीटर लांबीची ठिबक नळ्या ठेवलेल्या होत्या. रविवारी (ता. २२) मध्यरात्री चोरट्यांनी शेतातून या ठिबक नळ्या चोरुन नेल्याचा प्रकार सकाळी ८ वाजता उघडकीला आला. याबाबत त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर चोरी झाल्याची खात्री होउन दत्तात्रय सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बापू पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT