Theft  esakal
जळगाव

लक्ष विचलीत करून 5 लाखांची रोकड लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इंडियन गॅस एजन्सी येथील रोखपालाचे लक्ष विचलीत करून भामट्याने त्यांच्याजवळील पाच लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केली.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) : शहरातील इंडियन गॅस एजन्सी येथील रोखपालाचे लक्ष विचलीत करून भामट्याने त्यांच्याजवळील पाच लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केली. ही घटना मंगळवारी (ता. ३१) दुपारी चारच्या सुमारास शहरातील पंचशीलनगर येथे घडली.

इंडियन गॅस एजन्सी रोखपाल केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५, रा. गरताड, ता. चोपडा) यांनी मंगळवारी (ता. ३१) दुपारी चारच्या सुमारास पंचशीलनगरजवळील स्टेट बँकेच्या शाखेतून रोख पाच लाख रुपये काढून सोबत असलेले रमेश सोनवणे (वय ४०, रा. चोपडा) यांच्याबरोबर दुचाकीने (एमएच १९, डीपी ०९१३) शहरातील बापू टी. हाऊस येथे चहा प्यायला गेले होते. त्यावेळी रमेश सोनवणे चहाच्या दुकानात गेले व केशरलाल पाटील हे बाहेर दुचाकीजवळ पाच लाख रोख असलेली कापडी पिशवी घेऊन उभे राहिले. तेव्हा त्यांच्या मानेवर मुंग्या आहेत, त्यावर पाणी टाका, असे एका तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीने सांगितले व पाणी आणून दिले. केशरलाल पाटील हे मानेवर पाणी टाकण्यासाठी दुचाकीजवळ पैशांची कापडी पिशवी सोडून बाजूला आले असता दुसरी अनोळखी व्यक्ती पिशवी घेऊन पसार झाली. घटना घडल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

चोरीची मालिका सुरूच

गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी ८ सप्टेंबर २०२१ ला एका व्यापाराची १५ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास झाली होती. तर २६ ऑक्टोबर २०२१ ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अडीच लाखांची रोकड असलेली बॅग दिवसा चोरट्यांनी लंपास केली होती. आज पुन्हा पाच लाखांची रोकड घेऊन चोरटे फरार झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT