esakal
जळगाव

Jalgaon News : तापी नदीत बुडून 2 तरुणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील तापी नदीच्या लहान पुलाजवळील फरशीजवळ पोहण्यासाठी गेलेले पाच तरुण पाण्यात बुडाल्यानंतर तिघांनी कसाबसा आपला जीव वाचवला. दोन मित्रांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. (5 youths died after drowning in Tapi river jalgaon news)

खडका रोडवरील ग्रीन पार्क, ३२ खोली भागातील रहिवासी दानिश शेख जब्बार (वय १७) व अंकुश दौलतसिंग ठाकूर (वय १७) दोघे दुपारी दोनच्या सुमारास तापी नदी लहान पुलाजवळील फरशीजवळ पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्याच भागातील तीन युवकही होते. पाचही जण पाण्यात उतरल्यानंतर पोहू लागले.

मात्र, काही वेळातच पाचही जण बुडू लागले. आपण पाण्यात बुडत आहोत, हे लक्षात येताच तिघांनी कसाबसा आपला जीव वाचवला व ते पाण्याबाहेर आले.

आपल्यासोबतचे दोघे पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच या तिघांनी घरी येऊन मृत तरुणांच्या परिवाराला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांसह नागरिकांनी तापी नदीवर धाव घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कंखरे व कर्मचारी दाखल झाले.

दोघी मृत युवकांचे मृतदेह पाण्यातून काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरमध्ये आणण्यात आले. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली असून, दोन तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT