railway news Marathi  esakal
जळगाव

Central Railway News: प्रयागराजवरील अपग्रेडशनमुळे मध्य रेल्वेच्या 6 रेल्वे रद्द; काही गाड्यांचा मार्ग बदलविला

सकाळ वृत्तसेवा

Central Railway News : उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) मधील प्रयागराज स्थानकावरील प्रमुख यार्ड अपग्रेडेशन कामांमुळे, भुसावळ विभागातील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहे. (6 Central Railway trains cancelled due to upgradation of Prayagraj jalgaon news)

रेल्वे सेवा रद्द असलेल्या गाड्या अशा : ०१०२५ दादर-बलिया स्पेशल एक्स्प्रेस ही गाडी सोमवारपासून (ता.२७) ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे. ०१०२६ बलिया- दादर एक्स्प्रेस ही २९ नोव्हेंबर ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे. ०१०२७ दादर गोरखपूर एक्स्प्रेस ही उद्यापासून (ता.२८) ७ जानेवारीपर्यंत रद्द आहे.

०१०२८ गोरखपूर ते दादर एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे. ०७६५१ जालना-छपरा एक्स्प्रेस ही २९ नोव्हेंबर ते ३ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे. ०७६५२ छपरा जालना एक्स्प्रेस ही १ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द आहे.

पुढील माणिकपूर-प्रयागराज छेओकी-वाराणसी मार्गे वळविण्यात आल्या आहेत : प्रयागराज छेओकी स्टेशनवर तात्पुरता थांबा- १५०१७/१८ लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर एक्स्प्रेस प्रवास सुरू ही गाडी ८ जानेवारी २०२४ पर्यंत वळविली आहे. १५२६७/६८ लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल एक्स्प्रेस ते ६ जानेवारीपर्यंत वळून येईल.

११०३७/३८ पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस प्रवास ही ३० नोव्हेंबर ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत, ११०३३/३४ पुणे-दरभंगा एक्स्प्रेस ही २९ नोव्हेंबर ते ५ जानेवारीपर्यंत, १८६०९/१० एलटीटी- रांची एक्स्प्रेस प्रवास २९ नोव्हेंबर पासून ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत, २२१३१/३२ पुणे-वाराणसी एक्स्प्रेस आजपासून ते ३ जानेवारीपर्यंत वळविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT