Jalgaon Corporators esakal
जळगाव

जळगावचे 6 नगरसेवक शिंदे गटात

कैलास शिंदे

जळगाव : महापालिकेत भारतीय जनता पक्षातून (BJP) फुटून २७ नगरसेवकांनी शिवसेनेला सत्तेसाठी साथ दिली, त्यामुळे शिवसेनेची सत्ता महापालिकेवर (Jalgaon Municipal Corporation) आली. पाठिंबा देणाऱ्या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिली फूट आहे. (6 Jalgaon corporators in Shinde group Maharashtra Politics News)

जळगाव महापालिकेत भाजपतून फुटून शिवसेनेला पाठिंबा देणारे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, रेश्‍मा काळे, चेतन सनकत व कार्यकर्ता हर्षल मावळे यांनी बुधवारी (ता. २९) एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यांनी ठाणे येथे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. आपला पाठिंबा एकनाथ शिंदे यांना असल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत अंबरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरी उपस्थित होते.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की आम्ही भाजपतून बाहेर पडलो, त्या वेळी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही आज सहा नगरसेवक असलो तरी फुटीर गटासह अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आम्ही खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली, आमच्यावर अपात्रतेची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे आताही यापुढे आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली. त्यावर खासदार शिंदे यांनी लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

शिंदे, गुलाबराव पाटलांशी चर्चा

एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांच्याशीही फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दारकुंडे यांनी दिली. ते म्हणाले, की गुलाबराव पाटील यांनी आपल्या अपात्रतेच्या बाबतीत आपण एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहोत, तसेच आपण स्वत: लक्ष देणार आहोत. दोन दिवस आपण मुंबईत थांबत असाल तर आपण भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT