bhusawal railway station esakal
जळगाव

Bhusawal Railway Station : 6 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट! विकासकामांचे मोदींच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Bhusawal Railway Station : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील विविध रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण होणार असून, त्यात पहिल्या टप्प्यात भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकांच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (ता. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. (6 railway stations in Bhusawal section will be transformed in first phase under Amrit Bharat Station Yojana jalgaon news)

यासाठी सुमारे १८० कोटी रुपये खर्च येणार असून, यात लँडस्केपसह प्रवाशांना विविध सुविधा देऊन स्थानकाचा संपूर्ण लुक बदलविला जाईल, अशी माहिती रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इती पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमती पांडे म्हणाल्या, की पंतप्रधान मोदी यांचे भविष्यातील भारतीय रेल्वेसंदर्भात एक व्हिजन आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत भारत स्टेशन योजनेसाठी देशातील एक हजार ३०९ स्थानकांची निवड करण्यात आली. यात मध्य रेल्वेच्या ७६ स्थानकांचा समावेश आहे; तर भुसावळ रेल्वे विभागाच्या १५ स्थानकांचा समावेश आहे.

मात्र, पहिल्या टप्प्यात मनमाड, बडनेरा, शेगाव, मलकापूर, नेपानगर, चाळीसगाव या सहा स्थानकांचा समावेश आहे. विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन केले जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या संदर्भात मनमाड रेल्वेस्थानकावर विभागाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, त्यासाठी मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

रविवारी सकाळी अकराला होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त मनमाड रेल्वेस्थानकावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडे म्हणाल्या, की रेल्वेच्या आधुनिकीकरणात आपला सांस्कृतिक वारसा जपून सुशोभीकरण होईल. त्यात प्रवासी सुविधेला प्रथम प्राधान्य असणार आहे.

भुसावळ विभागातील सर्व विभाग मिळून ‘गतीशक्ती युनिट’च्या माध्यमातून हा भव्य प्रकल्पही साकारला जात आहे. याशिवाय, अनेक सुविधा असून, या संदर्भात प्रवाशांच्या आणखी काही सूचना असतील तर BHUSAWALDRM@Gmail.com व ट्विटरवर सूचना कराव्यात, जेणे करून अधिक चांगले काय करता येईल, असे आवाहन इति पांडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT