alcohol seized esakal
जळगाव

वैजापूरला 78 हजारांची दारू जप्त; एकास अटक

नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा


चोपडा (जि. जळगाव) :
नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने तालुक्यातील वैजापूर येथील लिलाधर पंडित कोळी (वय ३८) यांच्या घरावर छापा टाकला असता बनावट टंगो, बियर व बॉबी संत्रा दारूचे एकूण ७८ हजार ६०० किमतीचे ३० खोके आढळून आलेत. ही कारवाई शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. लिलाधर कोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारावर विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या सापळा रचत तालुक्यातील वैजापूर येथील लिलाधर पंडित कोळी याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरात अवैधरित्या बोगस टॅगो, बियर व बॉबी संत्रा दारूचे एकूण ३० खोके आढळून आलेत. ज्याची किंमत ७८ हजार ६०० इतकी आहे. पोलिस कर्मचारी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून लिलाधर कोळी याच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, पोलिस कर्मचारी बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे, शकील शेख, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, शिवाजी बाविस्कर, संजय यहदे यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

Pune Air Pollution: पुण्याच्या हवेत तासाला मिसळते ६ टन सिमेंट; आरोग्यासाठी गंभीर धोका

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! योजनेचे अडकलेले हफ्ते लवकरच खात्यात जमा होणार; महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय, पण कोणता?

उड्डाणानंतर हवेतच विमानाचं इंजिन फेल, १५० प्रवाशांचा जीव टांगणीला; दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Gokul Dudh Sangh Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांत, कोल्हापुरात पुन्हा राजकीय धुरळा उडणार

SCROLL FOR NEXT