A police team with a truck caught carrying ration rice for sale in the black market.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रेशनचा साडे 8 लाखांचा तांदुळ पकडला; गोंदीयाकडे जाताना नशिराबादजवळ कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : धरणगाव येथून गोंदियाकडे ट्रकमधून काळ्याबाजारात जाणारा ८ लाख ३० हजार ६०२ रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतला.

धुळे पासिंगच्या ट्रकमधुन रेशन मालाची काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भुसावळ उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना मिळाली होती. (8 and half lakhs worth of ration rice was seized jalgaon crime news)

त्यानुसार त्यांच्या पथकासह कर्मचारी तत्काळ महामार्गावर तपासणीसाठी उतरले. नशिराबादचे सहायक निरीक्षक रामकृष्ण मोताळे, पोलिस नाईक सूरज पाटील आणि कर्मचाऱ्यांनी नशिराबादपासून ट्रक (एमएच १८, बीझेड १०३९)चा वाहनांद्वारे पाठलाग केला.

भुसावळकडे जाताना काही अंतरावर हा संशयीत ट्रक आडविण्यात आला. चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीच्या पास-परवान्याची विचारणा केली असता, त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगताच हा ट्रक नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आला.

दिवसभर ट्रकमधील तांदळाची मोजणी आणि तपासणी केल्यानंतर त्यात २९ हजार ४९० किलो वजनाचा रेशन मालाचा तांदूळ असल्याचे आढळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत ८ लाख ३० हजार ६०२ रुपये असून, या तांदळासह ४५ लाख रुपयांचा ट्रक जप्त करण्यात आला.

पुरवठा अधिकाऱ्यांकडून पंचनाम्यानंतर चालक धनराज रामदास सोनवणे (वय ४३), स्वप्नील संजू सोनवणे (वय २०, रा. भुसावळ) व नीलेश वाणी (रा. धरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT