Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेतील 86 कंत्राटी पदांच्या भरतीसाठी कट ऑफ यादी

सकाळ वृत्तसेवा,

Jalgaon News : महापालिकेच्या ८६ पदासाठी होणाऱ्या कंत्राटी भरतीसाठी गुणांची कट ऑफ यादी जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवार (ता. १)पासून घेण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या ८६ कंत्राटी भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते. महापालिकेतर्फे त्या अर्जांची छाननी करण्यात आली. (86 contract posts in Municipal Corporation recruitment jalgaon news)

उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. शनिवारी (ता. २८) या पदांसाठी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली. ती अशी ः कनिष्ठ अभियंता बांधकाम- ६० टक्के, कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा)- ६० टक्के, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- ५० टक्के, रचना सहाय्यक- ६० टक्के, आरेखक-४५ टक्के, वीजतंत्री- ५५ टक्के, वायरमन- ४५ टक्के, अग्निशमन फायरमन- ३५ टक्के, आरोग्य निरीक्षक- ४२ टक्के, संगणक चालक- ५० टक्के.

१ नोव्हेंबरला मुलाखती

कंत्राटी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी (ता. १) घेण्यात येणार आहेत. कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा), रचना सहाय्यक या पदासाठी १ नोव्हेंबरला सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.

आरेखक, वायरमन, वीजतंत्री पदासाठी १ नोव्हेंबरलाच दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेलेत मुलाखती होतील, तर अग्निशमन फायरमन, आरोग्य निरीक्षक, संगणक चालक पदासाठी गुरुवारी (ता. २) सकाळी अकरा ते दुपारी दोन व दुपारी तीन ते सहा या दोन सत्रांत मुलाखती घेण्यात येतील, असे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astrology : पुढच्या 60 तासांत बदलतीये ग्रह दशा! चमकणार 'या' 4 राशींचे नशीब; धनलाभासह मिळतील मोठ्या आनंदाच्या बातम्या

IMD Weather Forecast : सोशल मीडिया की IMD? हवामानाचा अचूक अंदाज कुठून घ्यावा? हवामान तज्ज्ञांनी सांगितली पेरणी ते काढणीपर्यंतची सोपी ट्रिक

Latest Marathi News Update : अमित शहांसोबत बैठकीत राजकीय चर्चा नाही- एकनाथ शिंदे

Mumbai News: मुंबईकरांना 'ऑक्सिजन' घेऊन फिरावे लागेल! बुलेट ट्रेनसाठी झाडे तोडण्यावरुन न्यायालयाचा सरकारला टोला

25,00,00,00,000ची संपत्ती, आलिशान व्हिल्यासारखं घर; राम चरणची लक्झरी लाइफस्टाईल पाहून तुमचे पण डोळे दिपतील

SCROLL FOR NEXT