Aaple Sarkar Portal News sakal
जळगाव

Aaple Sarkar Portal : आता क्रमानुसार मिळणार दाखले; ‘आपले सरकार’ पोर्टलवरून करा ऑनलाईन अर्ज

सकाळ वृत्तसेवा

भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा

Aaple Sarkar Portal : महसूल प्रशासनात विविध प्रकारचे दाखले देण्यात येतात. हे दाखले राज्य सरकारच्या ‘महाऑनलाईन या संकेत स्थळावरून ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ या प्रणालीद्वारे क्रमानुसारच मिळणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी 'सकाळ'ला दिली. (Aaple sarkar government portal for getting certificate in order jalgaon news)

राज्य सरकारने फिफो (फर्स्ट इन फर्स्ट आऊट) प्रणालीद्वारे ही प्रक्रिया सुरू केली असून, विविध दाखल्यांचे अर्ज त्याच्या क्रमानुसार ऑनलाइन पोर्टलवर तारखेनुसार दिसणार आहेत व क्रमानुसारच निकाली काढण्यात येणार आहेत.

या प्रणालीस फिफो नावाने संबोधले जात आहे. सामान्य नागरिकांना आपल्या वैयक्तिक प्रशासकीय कामासाठी, वैयक्तिक लाभाच्या कामासाठी शासनाकडून निगर्मित होणाऱ्या विविध दाखल्याची गरज भासते, यातही महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांची संख्या जास्तीची असते.

ज्या नागरिकांचा अर्ज प्रथम आलेला असेल त्या नागरिकांला दाखला प्रथम द्यावा लागणार आहे. क्रम तोडून मधूनच त्यानंतर आलेला दाखला देता येणार नाही तरी, आपले सरकार पोर्टलवरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नागरिक प्रमाणपत्र व दाखल्यासाठी अर्ज करू शकतात, तरी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही नायब तहसीलदार धनराळे यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य सरकारने त्यासाठी आकारलेले शुल्क व कालावधी
(दाखल्याचे नाव, त्यासाठी लागणारा कालावधी व शुल्क किती लागणार आहे याची क्रमवारी अशी)

- उत्पन्नाचा दाखला १५ (३४ रुपये)
- रहिवास दाखला ७ (३४ रुपये)
- राष्ट्रीयत्व १५ (३४ रुपये)
- अल्पभूधारक दाखला १५(३४ रुपये)
- जात प्रमाणपत्र ४५(३४ रुपये)
- नॉन क्रिमि्लेअर २१ (३४ रुपये)

एजंटच्या भूलथापांना बळी पडू नका

राज्य सरकारने वरीलप्रमाणे शुल्क दर व कालावधी ठरविलेला असून, सर्व सेतू चालकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दाखले व प्रमाणपत्रासाठी अधिकची पैशांची मागणी केल्यास, तहसील कार्यालयात तत्काळ लेखी तक्रार करावी, आणि कोणत्याही एजंटच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही नायब तहसीलदार धनराळे यांनी केले आहे.

प्रांतधिकारी प्रमोद हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील जनतेला या 'फिफो'प्रणाली च्या प्रक्रियेनुसार विविध प्रकारची दाखले व प्रमाणपत्रे वेळेत दिले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT