Municipal staff while serving seizure notice on a company in an industrial estate
Municipal staff while serving seizure notice on a company in an industrial estate  esakal
जळगाव

Abhay Yojana : थकबाकीदार 3 कंपन्यावर महापालिकेतर्फे जप्ती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेतर्फे थकबाकीदार (Arrears) मिळकतधारकांना सूट देण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या अंतर्गत गुरुवारी (ता. १६) औद्यौगिक वसाहतीतील तीन कंपन्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. (Abhay Yojana Seizure by Municipal Corporation on 3 defaulting companies jalgaon)

मिळकत थकबाकीदारांना आपली रक्कम भरण्यासाठी महापालिके ‘अभय शास्ती’ योजना सुरू केली आहे. मात्र, यानंतरही काही जण थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता महापालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

गुरुवारी औद्यौगिक वसाहतीत ही मोहिम राबविण्यात आली. यात थकबाकी असलेल्या पॅरामाउंट पेगनेट, हिंदुस्थान फेराईटस या ई सेक्टरमधील कंपन्यावर, तर जी सेक्टरमधील ॲग्रवाल ॲग्रो कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

मिळकतधारकास ५४ हजारांची सूट

महापालिकेतर्फे मिळकतधारकांना सूट देण्याची मोहीम सुरूच आहे. या अंतर्गत प्रभाग चारमधील मंगा तोताराम कुंभार यांच्याकडे ९३ हजार ५६८ रुपयांची थकबाकी होती. त्यांना ५४ हजार ३७५ रुपयांची शास्ती व सूट मिळाली. त्यांनी केवळ ३९ हजार १९३ रुपये भरले.

३१ मार्चपर्यंत सवलत

महापालिकेतर्फे नागरिकांना ३१ मार्चपर्यंत थकबाकीच्या मिळकतीवर शास्ती व सूट देण्यात येत आहे. थकबाकीदारांनी त्याचा लाभ घेऊन ही थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT