जळगाव

तलाठी, कोतवालला शेतावरील बोजा कमी करण्यासाठी दोनशे रुपयांची लाच भोवली

चेतन चौधरी

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील तलाठी आणि कोतवाल यांना उतार्‍यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी अवघ्या 240 रूपयांची लाच स्वीकारतांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील एका शेतकऱ्याने विकासो सोसायटीचे कर्ज घेतले होते, कर्जाची त्यांनी परतफेड केल्याने उताऱ्यावर असलेला बोजा कमी करायचा होता. यासाठी तलाठी प्रविण श्रीकृष्ण मेश्राम,(कुऱ्हे पानाचे, ता.भुसावळ) व कोतवाल प्रकाश दामू अहीर (रा.कुऱ्हे पानाचे,ता.भुसावळ) यांनी त्यांना लाच मागितली. याबाबत तडजोड होऊन 240 रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधीत शेतकर्‍याने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार एसीबीचे उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांनी एका पथकाची नियुक्ती केली. या पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिरे यांना 240 रूपये स्वीकारतांना अटक केली. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. कारवाईसाठी पोलीस उपअधिक्षक गोपाल ठाकुर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सफौ. रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांच्या पथकाने सहकार्य केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT