जळगाव

झाडाखाली आंबे वेचणाऱ्या बालकाचा अंगावर फांदी पडून मृत्यू !

डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

तरवाडे (ता.चाळीसगाव) : पिंपरखेड ता.चाळीसगाव येथे काल सायंकाळी तेरा वर्षीय एकुलत्या एक मुलाचा (Thirteen year old boy) त्यांच्याच शेतातील (farming) आंब्याच्या झाडाखाली (mango tree) आंबे वेचत होता. त्याच वेळी जोरात वारा आला आणि झाडाची फांदी (Tree branch) तुटून त्यांच्या अंगावर पडली. या घटनेत बालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू (death) झाल्याची घटना घडली.

(Thirteen year old boy mango tree branch Broken)

ईश्वर साळुंखे हे सोमवारी बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नी व मुलगा ओम (वय13) हे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचे गणेशपूर शिवारातील शेतातील आंब्याच्या झाडाखाली वादळामुळे आंबे पडलेले होते. त्याची आईसोबत आलेला ओम आंबे जमा करत होता तर आई काही अंतरावर बांधलेल्या गुरांना चारापाणी करत असतांना अचानक जोराचा वारा आला व त्यात आंब्याची मोठी फांदी तुटून आंबे वेचणाऱ्या ओमच्या अंगावर पडली व दुर्दैवाने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.

मुलाला खांद्यावर घेत आईची धाव

त्याच्या आईने आरडाओरड केली मात्र जवळपास मदतीला कोणीही नसल्याने त्या मातेने स्वतः आंब्याच्या फांदीखाली दबलेला एककुलता एक मुलगा बाहेर काढला व बेशुध्द अवस्थेत खांद्यावर घेत गावाकडे यायला निघाली पुढे काही अंतर चालून गेल्यावर जवळपासचे शेतकरी मदतीला धावून आले व ओमला चाळीसगाव येथील देवरे हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी उपराआधीच मृत असल्याचे घोषीत केले.

ओम पहिल्यांदा गेला शेतात

ओमच्या मृत्यूबाबत जेंव्हा बाहेगावी गेलेल्या वडीलांना मोबाईलवर कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली व तातडीने माघारी आले. यापुर्वी ओम कधीच शेतात जात नव्हता असे शेजारच्या शेतकऱ्यानी सांगितले.

कुटुंबावर शोककळा
आईवडीलांचा एकुलता मुलगा गेला तर बहिण तनुजा (वय 15) हिचा एकुलता एक लहान भाऊ आई व बहिणीसोबत शेतात हसत खेळत चालताबोलता गेले काही वेळात घरी जाणार तोच काही प्रमाणात वादळी वारा आल्याने आंब्याची फांदी पडताच होत्याच नव्हते झाले संपुर्ण गावात शोककळा मनमिळावू कुटुंब भाऊबंदकी नसतांना गावाशी मिळूनमिसळून राहणाऱ्या कुटुंबाच्या दुःखाने पुर्ण गावात हळहळ व्यक्त होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT