जळगाव

शौचास दोघे शेतात गेले आणि जीव गमावून बसले; कसा ? वाचा सविस्तर  

रईस शेख

जळगाव :  पहाटे पहाटे शेतात जेव्हा भरधाव कार घुसते आणि गावावर शोककळा पसरते अशी घटना जळगाव शहराजवळील पाळधी येथे आज झाली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर घटनास्थळी चालकाने कार सोडून पळ काढला. पाळधी पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अशी झाली घटना...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर भावसार (वय ५०, रा. सोनारवाडा, पाळधी, ता. धरणगाव) आणि गावातीलच शेख मुक्तार शेख उस्मान (६०, रा. कसाईवाडा, पाळधी) हे दोघे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास गावाच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र स्वॉमिलजवळ शौचास बसले होते. जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतात शिरून दोघांना धडक दिली. यात प्रभाकर भावसार जागीच ठार झाले, तर शेख मुक्तार गंभीर जखमी झाले.

चालक गाडी सोडून फरार

अपघात होताच चालकाने कार सोडून पळ काढला. दरम्यान, घटना घडताच नागरिकांची मोठी गर्दी केली. दोघांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यात प्रभाकर भावसार मृत झाल्याची घोषणा डॉ. संदीप पाटील यांनी केली, तर जखमीस उपचारार्थ दाखल करण्यात आले. 


मृत प्रभाकर भावसार आचारी असून, मोठ्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचे काम करतात. त्यांच्या मागे पत्नी अरुणा, आई चिंधाबाई, दीपक आणि कल्पेश हे दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पाळधी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तपास करीत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

'अरे हा तर आजोबा राजेश खन्नासारखा दिसतो' अक्षय-ट्विकलचा मुलगा आरवला पाहून चाहते शॉक, Viral Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Air India Pilot Alcohol Test : एअर इंडियाचा वैमानिक दारू पिऊन विमानात, झ्युरिच विमानतळावरील उड्डाणापूर्वीची घटना, थेट केलं निलंबन

SCROLL FOR NEXT