auto_20accident.j 
जळगाव

15 जणांचा एकाचवेळी मृत्यु; ट्रक पलटी होवून घडली दुर्घटना

राजू कवडीवाले

यावल : तालुक्यातील किनगाव गावाजवळ पपईची वाहतुक करणारे आयशर वाहन उलटून पपई खाली दबून पंधरा मजूरांचा जागीच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना  सोमवार (ता.१५) मध्यरात्री साडेबारा ला घडली आहे. या अपघातात मृत झालेले सर्व मजूर रावेर तालुक्यातील अभोडा, केरहाळा, विवरा, व रावेर येथील आहेत. मृतात अभोडा येथील एकाच कुटुंबातील अकरा जणांचा समावेश असून त्यात दोन लहान बालक, तर सहा माहिलाचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

धुळे येथून चोपडा मार्गे रावेरला जाणा-या आयशर वाहन क्र. (एमएच  १९ झेड३५६८)चा गुल्ला तुटल्याने वाहन उलटून अपघात झाला. आयशर ट्रक चालक शेख जहीर शेख बद्रुद्दिन ( रा.मोमिनपुरा रावेर)  यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतांना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, येथील पोलिस निरीक्षक सुधिर पाटील यांनी भेट दिली असून येथील ग्रामीण रुग्णालयात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी भेट दिली दरम्यान भुसावळ चे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी येथे ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांना निष्काळजीपणा बद्दल खडे बोल सुनावले.


किनगाव अपघातातील मृतांची नांवे-
एकट्या आभोडा गावांतील 11 जणांचा मृत्यू

1)शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार वय 30 रा फकीर वाडा रावेर-
2)सरफराज कासम तडवी वय 32 रा के-हाळा :
3)नरेद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा
4) डिंगबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर-
5)दिलदार हुसेन तडवी वय 20 आभोडा-
6)संदीप युवराज भालेराव वय 25 रा विवरा
7) अशोक जगन वाघ वय 40 रा आभोडा -
৪)दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा आभोडा
9)गणेश रमेश मोरे वय 05 वर्ष रा आभोडा -
10) शारदा रमेश मोरे वय 1.5 वर्ष रा आभोडा-
11) सागर अशोक वाघ वय 03 वर्ष रा आभोडा -
12) संगीता अशोक वाघ वय 35 रा आभोडा -
13) सुमनबाई शालीक इंगळे वय 45 रा आभोडा-
14) कमलाबाई रमेश मोरे वय 45 रा आभोडा, 
1 5)सबनुर हुसेन तडवी वय 53 रा आभोडा -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'जरांगे-पाटील यांच्याशी आमचा कवडीचा संबंध नाही'; शरद पवारांनी नाशिकमध्ये दिले स्पष्टीकरण

IND vs PAK : सूर्यकुमार यादव भाजपा प्रवक्ता... Asia Cup मध्ये लाज निघाल्यावर टीम इंडियाच्या कॅप्टनवर पाकिस्तानकडून नको ते आरोप; कोण म्हणतंय असं?

अरे हे चाललंय तरी काय! पुन्हा बदलली झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेची वेळ? नेटकऱ्यांनीच दाखवला फोटो

Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Hug My Younger Self स्टाईलचा फोटो बनवा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT