Phule market  jalgaon
Phule market jalgaon esakal
जळगाव

विक्रेत्यांचे साहित्य जाते कुठे? अतिक्रमण विभाग चक्रावला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील फुले मार्केट व महात्मा फुले मार्केटमधील वाढत्या अतिक्रमणाबाबत आता महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभागही चक्रावला आहे. तब्बल ३०० अतिक्रमणधारक विक्रेत्यांचे साहित्य रात्री कुठे ठेवले जाते, असा प्रश्‍न त्यांच्यासमोरही निर्माण झाला आहे. या ठिकाणचे दुकानदारच त्यांना भाडेतत्वावर साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचा संशय आता अतिक्रमण निर्मूलन विभागाला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबत आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मध्यवर्ती भागात असलेल्या फुले मार्केट व महात्मा फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. मार्केटमधील भर रस्त्यावरच विक्रेते ठिय्या मांडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठीही रस्ता शिल्लक राहत नाही. सायंकाळी तर परिस्थिती अत्यंत गंभीर असते या ठिकाणी पाय ठेवायला जागा शिल्लक राहत नाही. या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिकेने वेळोवेळी कारवाई केली आहे, मात्र अतिक्रमण पुन्हा पुन्हा होत आहे.

कारवाई झाली, पुन्हा अतिक्रमण

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. या ठिकाणचे अतिक्रमण हटविले परंतु दुपारी पुन्हा अतिक्रमण झाल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी साहित्य जप्त करतात परंतु त्या ठिकाणी त्यांचे साहित्यच आढळत नाही. नेमके ते कुठे ठेवले जाते, याबाबत आता महापालिकेलाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

दुकानदारच ठेवतात साहित्य

अतिक्रमण धारकांचे साहित्य या ठिकाणचे दुकानदारच आपल्या दुकानात ठेवत असल्याचा संशय अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे व्यक्त होत आहे. याबाबत या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, की या ठिकाणी साधारणतः ३०० अतिक्रमणधारक आहेत. त्यांचे साहित्य रात्री ते बाहेर ठेवत नाही, या ठिकाणच्या पेट्या, गाड्या ही पध्दत बंद झाली आहे. मग हे साहित्य रात्री तसेच दिवसा कारवाईच्या वेळी कुठे ठेवतात? या ठिकाणी असलेल्या दुकानदारांकडे भाडे तत्त्वावर हे साहित्य ठेवत असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरच्या जागा भाडेतत्वावर दिल्या असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वाढत्या अतिक्रमणाचे गुपित या दुकानदारांमध्येच लपले असल्याचा आरोप अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे करण्यात आला आहे.

जनतेला त्रास

महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग, फुले मार्केटचे दुकानदार यांच्या वादामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी खरेदीस येणारा ग्राहक अतिक्रमणामुळे मात्र त्रस्त आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी वादही वाढत आहे. त्यामुळे हे धोकादायक आहे. त्यामुळे आता अतिक्रमणाला सहकार्य करणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

''आम्ही फुले मार्केटच्या अतिक्रमणधारकावर कारवाई सुरू केली आहे. आमच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे, आम्ही कारवाई सुरू केल्यावर अतिक्रमणधारक दुकाने लावत नाही. परंतु आमचे कर्मचारी तेथून हटले की लगेच दुकाने सुरू होतात.'' - संजय ठाकूर अधीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महापालिका जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT