Satara District Court esakal
जळगाव

न्यायालयाचे मनपासह शासन- प्रशासनावर ताशेरे

संपूर्ण यंत्रणाच निर्ढावलेली, रस्तेप्रश्‍नी खुलासाही नाही; सोमवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या प्रती महापालिकेसह शासन, प्रशासनाची किती उदासीनता आहे व ही यंत्रणा किती निर्ढावलेली आहे, याचा प्रत्यय आल्याने न्यायालयाने या यंत्रणांवर ताशेरे ओढले. रस्तेप्रश्‍नी ॲड. प्रदीप कुळकर्णी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रातिनिधिक दाव्यावर शुक्रवारी (ता. ३) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात दावा दाखल करण्याआधी ॲड. कुळकर्णी यांनी महापौर, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव यांना नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीला उत्तर मिळाले नाही.

दाव्यालाही जुमानले नाही

ॲड. कुळकर्णी यांनी अखेर न्यायालयात प्रातिनिधिक दावा दाखल केला. या दाव्यात गेल्यावेळच्या तारखेला न्यायालयाने महापौर,मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव यांना प्रोसेस इश्‍यू जारी केले. यंत्रणांना खुलासा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली.

खुलाशाचा मार्गही बंद

मात्र, मुदत संपल्यानंतरही यंत्रणांनी खुलासा दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने या सर्व यंत्रणांवर आज ताशेरे ओढत ‘खुलासा नाही’ असा शेरा मारला. त्यामुळे या यंत्रणांचा आता याप्रश्‍नी खुलासा सादर करण्याचा मार्गही बंद झाला.

सोमवारी सुनावणी

दरम्यान, ॲड. कुळकर्णी यांनी याच दाव्याला अनुसरून न्यायालयाला शहरातील रस्त्यांची पाहणी करावी, अशी विनंती केली आहे. त्यासंदर्भातही मनपा, प्रशासनाने खुलासा दिलेला नाही. या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. मनपाकडून ॲड. केतन ढाके यांनी या प्रकरणात वकीलपत्र काढून घेतले असून मनपाकडून ॲड. अमोल मुजुमदार काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT