contractor has started work at Faizpur jalgaon news esakal
जळगाव

Sakal Impact : फैजपूरला ठेकेदाराकडून कामे सुरु; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (जि. जळगाव) : किरकोळ बांधकामाचा वार्षिक ठेका दिलेल्या ठेकेदाराने शहरात ढापे व अत्यावश्यक किरकोळ बांधकामाची (Construction) कामे करण्यासाठी नकार दिल्याने या ठेकेदारासमोर पालिका हतबल झाल्याच्या मथळ्याखाली ‘सकाळ’ने आज वृत्त प्रसिद्ध केले. (after news published in sakal newspaper about municipality is helpless in front of contractor has started work at Faizpur jalgaon news)

त्याची पालिकेने दखल घेत, शहरातील न्हावी दरवाजा जवळील नारखेडे वाड्यात असलेल्या मुख्य रस्त्यावरील ढाप्याच्या कामाला सुरुवात केली आहे. येथील पालिकेकडून नागरिकांच्या अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी किरकोळ बांधकामाचा वार्षिक ठेका दरवर्षी दिला जातो. या ठेक्यात झालेल्या कामांसाठीचा खर्च पालिका करते.

या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या वर्षांसाठी किरकोळ वार्षिक कामांचा ठेका शहरातील ठेकेदाराला दिलेला आहे. त्याने जेमतेम ढापे, किरकोळ गटारी अशी कामे केली आहेत. यापैकी काही कामांचे बिल पालिकेकडून अदा करण्यात आले आहे.

तर ठेकेदाराची काही कामांचे बिलांची पालिकेकडे घेणे बाकी आहे. बाकी बिलांची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत दुसरी कामे न करण्याचा पवित्रा घेत संबंधित ठेकेदाराने वार्षिक ठेक्यातील कामे करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्यामुळे किरकोळ कामे रखडली होती. पालिकेच्या सभेत आवश्‍यक त्या ठिकाणी ढापे टाकण्याच्या विषयावर चर्चा होऊन पालिकेच्या बांधकाम अभियंत्यांकडे नगरसेवकांनी पाठपुरावा देखील केला होता.

त्यांनी संबंधित ठेकेदाराकडून वार्षिक ठेक्याच्या शर्ती अटीनुसार ही सर्व कामे करून घेणे अपेक्षित असताना उलट या ठेकेदाराची पाठराखण केल्याचे दिसून येत होते. या विषयावर लोकभावना तीव्र झाल्याने ‘सकाळ’ने रविवारच्या अंकात ‘त्या’ कामांना ठेकेदाराकडून नकार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले.

त्याची दखल घेत, शहरातील उत्तरेस असलेल्या न्हावी दरवाजा जवळील नारखेडे वाड्यात मुख्य रस्त्यावरील ढाप्याच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे वार्षिक ठेकेदार त्याच्या बाकी बिलांची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत दुसरी कामे करणार नाही यावर ठाम असल्याने पालिकेने दुसऱ्या ठेकेदाराकडून हे काम करणे सुरु केले आहे.

यासोबतच इस्लामपुरा मशिदजवळ व न्हावी दरवाजाकडून तडवी वाड्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच नारखेडे वाड्याकडून तहानगरकडे मुख्य रस्त्यावर देखील ढापे त्वरित टाकण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वार्षिक ठेक्याची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. या ठेक्याच्या मुदतीत शर्ती अटी नुसार संबंधित ठेकेदाराने वार्षिक ठेक्याची कामे न केल्यास त्याच्या काही कामांचे बिलांची बाकी रक्कम अदा करू नये. शिवाय वार्षिक कामांचा ठेका देताना आदेशात असलेल्या शर्ती व अटींचा भंग झाल्याने योग्य ती कारवाई देखील करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT