Former NCP MLA Arun Patil, while deliberating for the election of Agricultural Produce Market Committee,
Former NCP MLA Arun Patil, while deliberating for the election of Agricultural Produce Market Committee,  esakal
जळगाव

Market Committee Election : महाविकास आघाडी करण्यावर जोर.. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करून निवडणूक लढवावी, भारतीय जनता पक्षाशी युती करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ३० पैकी २५ पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केले. (Agricultural Produce Market Committee election Maha Vikas Aghadi should contest election Expressed by interested candidates jalgaon news)

मात्र काही उमेदवारांनी सर्वपक्षीय आघाडी करून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. अखेर पक्षाचे जिल्हाध्यक्ष जो आदेश देतील तो मान्य करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

येथील तालुका खरेदी विक्री संघ कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकास्तरीय बैठक माजी आमदार अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, पक्षाच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, राजेश वानखेडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी बैठकीत चर्चा केली.

बहुतांश सदस्यांनी बाजार समितीची निवडणूक काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडीद्वारे लढवावी, असे मत व्यक्त केले. मात्र अंतिम क्षणी काही इच्छुकांनी भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन सर्वपक्षीय पॅनल करण्यासंदर्भात मत व्यक्त केले. यामुळे या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. पुढील निर्णय जिल्हा नेत्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

बैठकीत माजी तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, योगिता वानखेडे, योगिता वानखेडे, माजी सरपंच गणेश महाजन, राजेंद्र चौधरी, अनिल आसेकर, सुनील कोंडे, निलेश चौधरी, गयासउद्दीन काझी, एल. डी. निकम, शेख महेबूब, पांडुरंग पाटील, दिलीप पाटील, गणेश चौधरी, हेमराज पाटील, लक्ष्मण मोपारी, प्रभाकर पाटील, मंदार पाटील,शेख असगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

"आजच्या बैठकीचा वृत्तांत तालुकाध्यक्ष या नात्याने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना देणार आहोत. त्यांच्या व पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने पॅनेल बनविण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल." - किशोर पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रावेर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT