maharashtra agriculture department  sakal
जळगाव

कृषी प्रक्रिया उद्योग : 68 प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रखडले

केंद्र पुरस्कृत कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत राष्ट्रीयकृत बँकांकडे ६८ प्रस्ताव रखडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : केंद्र पुरस्कृत कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत राष्ट्रीयकृत बँकांकडे ६८ प्रस्ताव रखडले आहेत. या उद्योगांना सुरू करण्यासाठी निधीची गरज आहे. बॅंकांकडे अनेक महिन्यांपासून या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून कर्ज मंजूर करावे व कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. परंतु तरी राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी लक्ष देत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेवून मार्गदर्शन करावे, अशी व्यथा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २४) जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या ‘डीएलसीसी’च्या बैठकीत मांडली.

एकीकडे देशातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासन विविध योजना सुरू करते आहे. त्यांनी कृषी संबंधित पूरक प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत अर्थसाहाय्य मंजुरीची योजना तयार करते. मात्र बँका त्यावर निर्णय न घेता ती प्रकरणे पेंडिंग ठेवतात. ही बाब कितपत योग्य आहे, अनेक वेळा बँकांमध्ये प्रकरण मंजुरीसाठी अडचणी विचारल्या मात्र त्याही सांगितल्या जात नाही. प्रकरणेही मंजूर केले जात नाही. मग या योजना राबवायच्या कशा? असा प्रश्‍न करण्यात आला.

बॅंक अधिकारी धारेवर

जिल्हाधिकारी राऊत यांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना समज देत संबंधित प्रकरणात लक्ष घालून ती मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी, संबंधित प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी खरीप कर्ज वाटपाचा आढावा घेऊन खरीप कर्ज वाटप वाढवा, शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

बँकनिहाय प्रलंबित प्रकरणे

बँकेचे नाव प्रलंबित प्रकरणे

* स्टेट बॅंक ऑफ इंडिया--१७

* सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया--९

* एचडीएफसी बँक--७

* आयडीबीआय बँक--४

*कोटक महिंद्रा बँक--२

* महाराष्ट्र ग्रामीण बँक--५

* पंजाब नॅशनल बँक--१

* सारस्वत बँक--१

* जळगाव पिपल्स बँक-१

* युनियन बॅंक ऑफ इंडिया--३

* अकोला जनता कर्मशिअल बँक--१

* बॅंक ऑफ बडोदा--७

* बँकऑफ महाराष्ट्र-४

* बॅंक ऑफ इंडिया--२

* आयसीआयसीआय--२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT