Eknath Khadse Ajit Pawar
Eknath Khadse Ajit Pawar esakal
जळगाव

Eknath Khadse : अजितदादांनीच 'हा' दावा फेटाळून लावलाय; काय म्हणाले एकनाथ खडसे?

सकाळ डिजिटल टीम

‘जोपर्यंत माझ्यात जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीचे काम करत राहणार’, असं त्यांनी जाहीर केलंय.

जळगाव : अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु, या चर्चांना अजित पवारांनी (Ajit Pawar) मंगळवारी (18 एप्रिल) पूर्णविराम दिला.

असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांचं ज्याप्रमाणं माझ्यावर प्रेम आहे, त्याचप्रमाणं विरोधी पक्षनेते अजित पवार हेसुद्धा माध्यमांच्या आवडीचे आहेत. त्यामुळं ते दिसले नाहीत, की ‘नॉट रिचेबल’ असल्याचं सांगितलं जातं, त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असं स्पष्ट मत आमदार खडसे यांनी व्यक्त केलं.

खडसे म्हणाले, 'अजित पवारांच्या भाजप प्रवेशात कुठलंही तथ्य नाही. स्वतः अजितदादांनीच हा दावा फेटाळून लावलाय. ‘जोपर्यंत माझ्यात जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीचे काम करत राहणार’, असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळं हा विषय संपला आहे.' यावेळी खडसेंनी महागाईवर भाष्य केलं. शेतकरी अवकाळी आणि गारपिटीमुळं आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. तर, दुसरीकडं बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. सरकार याकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजीनगरमध्ये तणाव! ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; जोरदार घोषणाबाजी

Dark Circle Remedy: प्रियांका चोप्राची आई मधु चोप्राने दिलेल्या टिप्सने दूर होतील डोळ्याखालील काळे डाग

PM Modi: 'काँग्रेस देशाला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवत आहे..', PM मोदी यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने; दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Uddhav Thackeray : मोदींना महाराष्ट्र दिल्ली पाहू देणार नाही! ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात,आता वानप्रस्थाश्रमात जा

SCROLL FOR NEXT