School esakal
जळगाव

तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा; गुरु-शिष्यांच्या आठवणींना उजाळा

टोळी माध्यमिक विद्यालयातील १९९८ - ९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला.

संजय पाटील

पारोळा (जि. जळगाव) : तालुक्यातील टोळी माध्यमिक विद्यालयातील १९९८ - ९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला. जुन्या आठवणींना उजाळा देत तब्बल २३ वर्षानंतर शाळा भरल्याची प्रचिती या स्नेहमेळावाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. (Alumni met at the school after 23 years)

या वेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली यशस्वी वाटचाल कशी झाली. गुरूंच्या आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी प्रवासाचा टप्पा कसा गाठला, याबाबत मनोगत व्यक्त केले. या वेळी ललिता पाटील, मनीषा पाटील, मनीषा पाटील, रंजना पाटील, शकुंतला पाटील, कविता पाटील, रेखा पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून सामाजिक जीवनात नेहमी यश संपादन करावे, असा आशीर्वाद दिला. तब्बल २३ वर्षानंतर गुरू व शिष्य एकत्र आल्याने अनेकांना गहिवरून आले होते. समाधान पाटील यांनी प्रास्ताविक केले. ललिता पाटील यांनी आभार मानले.

तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिर येथे टोळी येथील माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. टोळी येथील मुख्याध्यापक आर. एम. देवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर माजी मुख्याध्यापक एस. एस. पवार, डी. के. पाटील, डी. जे. पाटील, एस. एस. पाटील, एस. ए. पाटील, बी. बी. देवरे, एस. सी. बेलदार, आर. पी. महाजन, श्री. सैंदाणे, डॉ. संदीप पाटील, एस. के. पाटील, मधुकर पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी मनोगतात विनोद पाटील यांनी लिपिक ते सरपंचपदाचा प्रवास, त्यानंतर तालुका शिक्षकेतर संघटना, तालुकाध्यक्षपदाची धुरा व सामाजिक कार्यात २३ वर्षांचा प्रवास कथन केला. ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर यश निश्चित मिळते, असे मित्रपरिवाराला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT