Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Amalner Market Committee Election : 85 जणांची माघार; 2 उमेदवार बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सुमारे १४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात ८५ जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली असून, ५३ उमेदवार रिंगणात आहेत. (Amalner Market Committee Election 85 people have withdrawn 53 candidates are in election jalgaon news)

यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार असून, पॅनलला अपक्ष उमेदवारांचे आव्हान राहणार आहे. तर व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आता प्रत्यक्ष १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

येथील बाजार समितीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी सुमारे ८५ जणांनी माघार घेतली असून, ५३ उमेदवार आता रिंगणात आहेत. त्यात सोसायटी सेवा सर्वसाधारण मतदारसंघात सात जागांसाठी ५८ जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यात ३२ जणांनी माघार घेतली असून, २६ उमेदवार रिंगणात आहेत.

महिला राखीव मतदारसंघात ११ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात ५ जणांनी माघार घेतली असून, २ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघात १६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात १२ जणांनी माघार घेतली असून, एका जागेसाठी ४ जण रिंगणात आहेत. विजाभज मतदार संघात ७ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ जणांनी माघार घेतली असून, एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण मतदारसंघात २२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात १७ जणांनी माघार घेतली असून, दोन जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ जणांनी माघार घेतली असून, एका जागेसाठी ४ जण रिंगणात आहेत.

आर्थिक दुर्बल मतदारसंघात ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात ५ जणांनी माघार घेतली असून, एका जागेसाठी ३ जण रिंगणात आहेत. हमाल मापाडी मतदारसंघात ३ जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र यात कोणीही माघार न घेतल्याने एका जागेसाठी ३ जण रिंगणात आहेत.

व्यापारी बिनविरोध

व्यापारी मतदारसंघात ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात ५ जणांनी माघार घेतली असून, उर्वरित दोन उमेदवार हे बिनविरोध निवड झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महाविकास आघाडी, भाजप व आम आदमी पार्टीचे तीन पॅनल रिंगणात असून, तगड्या अपक्ष उमेदवारांचे देखील आव्हान राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागला नाही शोध

SCROLL FOR NEXT